Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रेल्वेच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू
ऐक्य समूह
Monday, July 09, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 8 : कोरेगाव, ता. कराड गावच्या हद्दीत रेल्वेेच्या धडकेत सना अब्बास मुलाणी (वय 18, रा. गोळेश्‍वर, ता. कराड) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सना मुलाणी ही सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात 12 वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. ती रविवारी सकाळी 9 च्या सुमारास कराड येथे क्लासला जाते असून सांगून घरातून गेली होती. तिचा कोरेगाव येथील पन्नाशी नावाच्या शिवारात रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याचा फोन वडील अब्बास मुलाणी यांना सायंकाळी 5 च्या सुमारास आला. ही माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व सनाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.   
मृतदेहाशेजारी पडलेल्या दप्तरात आढळलेल्या ओळखपत्रावरून सनाची ओळख पटली. पोलीस नाईक अभिजित देशमुख तपास
करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: