Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वरकुटे-मलवडी येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re1
5वरकुटे-मलवडी, दि. 11 : येथील उदय रामचंद्र यादव (वय 32) याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना वरकुटे -मलवडी, शेनवडी तसेच निंबवडे या तीन गावांच्या हद्दीकडेला ’अमनटेक’ नावाच्या शिवारात त्याच्याच पूर्वजांच्या मालकीच्या विहिरीत घडली.
या विहिरीत मंगळवार, दि.10 रोजी दुपारच्या सुमारास मेंढपाळास विहिरीमध्ये पुरुषचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसते. त्यानंतर ही वार्ता वरकुटे-मलवडी परिसरात समजली. दरम्यान, उदय यादव यांचा चुलत भाऊ चांगदेव हरी यादव यांनी या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्यात देत उदय दि.8 पासून घरातून निघून गेला असल्याची फिर्याद नोंदवली. म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि. मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. बीट अंमलदार खाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर   मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसवड शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि. मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार नंदकुमार खाडे तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: