Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सांगली पोलिसांकडून दत्ता जाधव टोळीवर आणखी एक ‘मोक्का’
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
5सातारा, दि.11 : प्रतापपूर, ता. जत येथे दत्ता जाधव याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी कुविख्यात गुंड दत्ता जाधव टोळीवर  सांगली पोलीस अधीक्षकांनी पाठवलेल्या प्रस्तावा-नुसार आणखी एक मोक्का लावण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मोक्काच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
प्रतापपूर, ता. जत येथे मोक्कांतर्गत पाहिजे असलेला आरोपी दत्ता जाधव याला पकडण्यासाठी पोलीस गेले असता युवराज रामचंद्र जाधव व त्याचे इतर सहकारी आरोपींनी पोलिसांनी दत्तात्रय जाधव यास अटक करू नये म्हणून माईकवरून पोलिसांना मारण्याची व पळवून लावण्याची चिथावणी दिली. पोलीस त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावत असताना आरोपी दत्ता जाधव यास पळून जाण्यास मदत करून पोलिसांना अटकाव करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्यावर हल्ला करून पोलीस कर्मचार्‍यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी दगडफेक करून, शासकीय वाहनांचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणून पोलीस कर्मचार्‍यांना जखमी केल्याचा गुन्हा जत पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यातील दत्तात्रय रामचंद्र जाधव (टोळीप्रमुख), युवराज रामचंद्र जाधव, भेजा वाघमारे, खली ऊर्फ कृष्णा हणमंत बडेकर, अमर रामचंद्र भांडे, शिवाजी बाळू पवार, अमोल रेवाप्पा होनेकर, जया जाधव, बंडा पैलवान, दीपक आप्पा लोंढे, अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव, सूरज ऊर्फ पप्पू घुले, मनीषा युवराज जाधव, धनराज ऊर्फ धनू बडेकर, मयुरी धोंडिराम ऐवळे, करिष्मा भीम हेगडे, मथुरा शामराव ऐवळे, सोमनाथ उत्तम मोरे यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सांगली पोलीस अधीक्षकांनी पाठवला होता. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी या टोळीवर 18 विविध ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
   
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: