Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अथणी शुगर्सला सात दिवसात ऊसबिले अदा करण्याची नोटीस
ऐक्य समूह
Thursday, July 12, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: re2
5उंडाळे, दि. 11 : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील रयत-अथणी शुगर्स लि.,ने 2017-18 मधील गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट एफआरपीप्रमाणे सात दिवसांच्या आत अदा करावे, अशी नोटीस साखर सहसंचालकांच्या आदेशावरून प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी बजावली आहे.
या नोटिशीत म्हटले आहे, की अथणी शुगर्सच्या गोदामात असलेली 3 लाख 35 हजार क्विंटल साखर, मोलॅसिस, बगॅस परवानगीशिवाय विकू नये. येत्या सात दिवसात ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे बिले अदा करावीत. तसे न केल्यास साखर, मोलॅसिस, बगॅस यांची प्रशासनाच्यावतीने विक्री करून शेतकर्‍यांची देणी भागविली जातील.
थकीत 17 कोटी अदा
याबाबत अथणी शुगर्सच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधाला असता,  कारखान्यात गाळपास आलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे 22 कोटी 49 लाख रुपये थकीत होते. साखरेचे दर अचानक घसरल्याने देशातील साखर उद्योगच अडचणीत आल्याने सर्वत्रच ही स्थिती झाली आहे. मात्र, व्यवस्थापनाने थकीत रकमेपैकी 17 कोटी 9 लाख रुपये शेतकर्‍यांच्या खात्यांवर वर्ग केले आहेत. उर्वरित 5 कोटी 50 लाख रुपये देय आहेत. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे प्रयत्न आहेत. सद्य स्थितीमुळे ऊसबिले देण्यास उशीर लागल्याची कबुली देताना एफआरपीप्रमाणे सर्वांची बिले अदा करण्याचे आश्‍वासन व्यवस्थापनाने दिले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: