Dainik Aikya - एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा : मोदी
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा : मोदी
ऐक्य समूह
Monday, July 30, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले आहे. आषाढी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बातमधून देशवासीयांना एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्या, असे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 46 व्या ‘मन की बात’मधून अतिवृष्टीसह देशातील विविध समस्यांवर भाष्य करतानाच पंढरपूरच्या वारीचे महत्त्वही अधोरेखित केले. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सामील होतात. शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी असते. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात जाणे याच्यासारखा दुसरा अध्यात्मिक आनंद नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा हा अनुभव घ्यायलाच हवा,  
असे आवाहन मोदी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन केले. तर प्रसिद्ध कवी नीरज यांनाही श्रद्धांजली वाहिली. आशा, विश्‍वास, दृढसंकल्प
यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कवी नीरज होते, अशा शब्दांत
त्यांनी नीरज यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पावसाळ्यात
होणार्‍या नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: