Dainik Aikya - ‘एस’ वळणावर पुन्हा अपघात
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘एस’ वळणावर पुन्हा अपघात
ऐक्य समूह
Monday, August 06, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : पुणे-बंगलोर महामार्गावर असणार्‍या ‘एस’ वळणावर रविवारी सकाळी पुन्हा एकदा अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ग्लोरिया प्रकाश डिसोझा (वय 30, रा. बालाजीनगर, आगाशिवनगर, कराड), देवदास दादू कांबळे (वय 27, रा. माळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि वेणीसा प्रकाश डिसोजा  (रा. आगाशिवनगर, कराड) हे दूध टँकरमधून निघाले होते. गाडी खंडाळ्याचा बोगदा ओलांडून आल्यानंतर एस वळणावर  एका वाहनाने दूध टँकरला पाठीमागून ठोकरले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: