Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कलम 35 अ : काश्मीर बंद, व्यवहार ठप्प
ऐक्य समूह
Monday, August 06, 2018 AT 11:41 AM (IST)
Tags: na2
5श्रीनगर, दि. 5 (वृत्तसंस्था) : घटनेच्या 35 अ कलमाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाविरोधात काश्मीर खोर्‍यातील फुटीरतावाद्यांनी बंद पुकारला आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर काश्मीरमधील सर्व व्यवहार आज ठप्प होते.
खोर्‍यातली परिस्थिती शांततापूर्ण होती, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. आज आणि उद्या हा बंद पुकारण्यात आला आहे. उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घटनेच्या 35 अ कलमाच्या वैधतेबाबत सुनावणी होणार आहे. राज्यातल्या आगामी पंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्‍वभूमीवर या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.   
अमरनाथ यात्रेवरही या बंदचा परिणाम झाला आहे. अमरनाथ यात्रा थांबण्यात आली आहे. भगवतीनगर बेस कँपमधून यात्रेकरूंना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घटनेच्या 35 अ या कलमानुसार जम्मू-काश्मीर राज्यातील जमीन बिगर काश्मीरी विकत घेऊ शकत नाही. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीएम आणि काँग्रेससह राजकीय पक्ष आणि फुटीरतावाद्यांची कलम 35 अ वर जैसे थे स्थिती ठेवण्याची मागणी आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: