Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दारूची चोरटी वाहतूक करताना एस.टी. कंडक्टरच सापडला
ऐक्य समूह
Tuesday, August 07, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : महाबळेश्‍वर एस.टी. आगारात कार्यरत असलेल्या वाहक अभिजित बाळकृष्ण शिंदे (वय 30, रा. सुलतानपूर, ता. वाई) याने पणजी (गोवा) येथून 60 हजार रुपये किमतीचे दारूचे चार बॉक्स चोरून सातारा बसस्थानकात आणल्यानंतर शहर पोलिसांनी कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त केला. वाहकावरच कारवाई झाल्याने एस.टी. कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून बसस्थानकात बघ्यांची गर्दी उसळली होती. एस.टी.तून चोरटी दारू वाहतूक होण्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे. या प्रकरणी शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी, पणजी-महाबळेश्‍वर एस.टी. बस सोमवारी दुपारी सातारा बसस्थानकामध्ये आली.    
या बसमधून दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना मिळाली होती. त्यामुळे
बसस्थानकातील पोलीस चौकीत नेमणुकीस असलेल्या पोलिसांना घेऊन त्यांनी एस.टी. बसची झडती घेतली असता टूल बॉक्समध्ये
दारूचे चार बॉक्स आढळले. त्यात विदेशी दारूच्या 60 हजार रुपये किमतीच्या 60 बाटल्या आढळल्या. या कारवाईमुळे एस.टी. कर्मचारी थक्कच झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: