Dainik Aikya - क्रांतिदिनी जिल्ह्यात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
क्रांतिदिनी जिल्ह्यात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन
ऐक्य समूह
Tuesday, August 07, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे, या आणि अन्य मागण्यांसाठी गुरुवार, दि. 9 रोजी क्रांतिदिनी म्हणजे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात टाळाटाळ केली जात असल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने सरकारचा निषेध केला असून ऑगस्ट क्रांतिदिनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. पुण्यात झालेल्या आरक्षण परिषदेत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्‍वासन दिले असले तरी लेखी स्वरूपात काहीही दिलेले नाही. त्यामुळे ऑगस्ट क्रांतिदिनी आंदोलन छेडण्याचा निर्णय कायम आहे.
जिल्ह्यात सातारा तालुका वगळता सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर क्रांतिदिनी 11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन केले जाईल. त्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले जाईल. शासनाच्या कृतीचा निषेध करून आंदोलन शांततेत करण्यात येईल. सातारा शहर व तालुक्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. शासकीय विश्रामगृहावर समन्वयकांच्या बैठकीत आंदोलन शांततेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा समाजाने आपापल्या भागातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनात सामील व्हावे,  अशा सूचना देण्यात आल्या. तालुका पातळीवरील आंदोलनांची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील समन्वयकांनी घ्यावी, असेही
सांगण्यात आले.
सातारा शहर व तालुक्यातील मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात सामील व्हावे, शासनाला आपल्या मागण्यांची जाणीव करून द्यावी, असे ठरवण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: