Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उरमोडीच्या पाण्याद्वारे गोंदवलेसह इतर गावांचा पाणी प्रश्‍न सोडवू : आ. जयकुमार गोरे
ऐक्य समूह
Wednesday, August 08, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re4
5दहिवडी, दि. 7 : उरमोडीचे पाणी येत्या पंधरा दिवसात पिंगळीच्या कालव्याद्वारे ओढ्यात सोडून गोंदवल्यासह इतर गावांचा पाणी प्रश्‍न सोडवू, असा शब्द आ. जयकुमार गोरे यांनी दिला.
उरमोडी योजनेतून पिंगळी तलावात पाणी सोडण्यासाठी पाटाची कामे सुरू आहेत. या पाटातून पिंगळी खुर्द व वाघमोडेवाडी ओढ्यात लवकरात लवकर पाणी सोडावे व शेतीसह जनावरांसाठीचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी वाघमोडेवाडीत शेतकर्‍यांनी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला शिवाजीराव वाघमोडे, अजित पोळ, श्रीकृष्ण कट्टे, मोहनराव शेलार, आनंदराव भोसले, विठ्ठलराव काळे, हणमंतराव जाधव, महादेव अवघडे, वसंतराव वाघमोडे, बबनराव काळेल, सतीश अवघडे, राजेंद्र कट्टे, संतोष कट्टे, उल्हास वाघमोडे, उरमोडी प्रकल्प कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड, उपअभियंता स्वप्निल पवार, विजयराव राजमाने तसेच गोंदवले बुद्रुक, खुर्द, वाघमोडेवाडी, पिंगळी खुर्द, किरकसाल येथील शेतकरी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यातील अनेक पिढ्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. हा मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी तीस वर्षांपूर्वीच प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाहीत. मी मात्र सर्वस्व पणाला लावून उरमोडीचे पाणी माणमध्ये आणले. विरोधकांनी मात्र याबाबत केवळ राजकारण केले. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले. गावगावात साखळी बंधारे झाल्याने पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी मदत झाली आहे. परंतु हा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अनिल देसाई यांना अप्रत्यक्ष टोला
आमचे सरकार असल्यामुळे पाणी आम्हीच आणणार, असे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते सांगत असले तरी हे पाणी फक्त जयकुमारनेच आणले असल्याने वरकुट्याच्या पिपाणीनेही पाणी पूजन करून पाणी आणल्याचे समाधान करून घेतले, असे नाव न घेता अनिल देसाई यांना टोला लगावला.
सेवानिवृत्तीनंतरच माणचा कळवळा का?
उच्चपदस्थ अधिकारी असताना विकासकामे करणे सहज शक्य होते. मात्र, तसे न करता निवृत्तीनंतर माणचा खोटा कळवळा आला असल्याची टीका आ. गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांच्यावर केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: