Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणात 92.59 टीएमसी पाणीसाठा
ऐक्य समूह
Wednesday, August 08, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: re3
5पाटण, दि. 7 : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून शिवसागर जलाशयात 12 हजार 146 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, धरणाच्या पायथा वीजगृहातून अद्याप 2 हजार 100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. धरणात 92.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
मंगळवार दि. 7 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 10 (3832), नवजा 11 (3847), महाबळेश्‍वर 9 (3339) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलपातळी 2153 फूट 8 इंच, 656.438 मीटर व पाणीसाठा 92.59 टीएमसी इतका झाला आहे. धरणात सध्या 12 हजार 146 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणार्‍या पाण्याची आवकही कमी झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: