Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बीपीसीएल शुद्धीकरण प्रकल्पात स्फोट
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: mn4
43 कर्मचारी जखमी; शेकडो कर्मचारी बचावले
5मुंबई, दि. 8 (वृत्तसंस्था) : चेंबूर-माहुल येथील बीपीसीएल तेलशुद्धीकरण प्रकल्पातील हायड्रो-क्रॅकर युनिटमध्ये आज दुपारी 3 च्या सुमारास झालेल्या बॉयलर स्फोटात 43 कर्मचारी जखमी झाले असून त्यातील 21 कर्मचार्‍यांना चेंबूरमधीलच इन्लॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बीपीसीएलच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पात दुपारी तीन वाजता हा स्फोट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्फोटात एकूण 43 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील 22 कर्मचार्‍यांवर बीपीसीएल प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले तर 21 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. काही कर्मचार्‍यांना फ्रॅक्चर झाले आहे तर काही जणांना गंभीर इजा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, मुंबई पालिका आणि माझगाव डॉक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: