Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याने कुसुंबीतील एकास अटक
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: re1
5कुडाळ, दि. 8 : कुसुंबी, ता. जावली येथील सुरेश जगन्नाथ चिकणे (वय- 35) याने एका महिलेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. संशयित सुरेश चिकणे याला न्यायालयाने दि. 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेला तू खूप सुंदर आहेस. तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत सुमारे एक महिन्यापूर्वी त्या महिलेच्या घरात जाऊन, घराचे दार लावून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन सुरेश चिकणे याने आपणावर जबरी अत्याचार केला. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तसेच बदनामीमुळे त्यावेळी कोणाला सांगितले नाही. परंतु तद्नंतर सहा वेळा त्याने शारीरिक अत्याचार केल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. पोलिसांनी चिकणे याला तातडीने अटक केली. अधिक तपास सपोनि जीवन माने करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: