Dainik Aikya - 44 हजाराचा गुटखा कराड येथे पकडला
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
44 हजाराचा गुटखा कराड येथे पकडला
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 8 : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, कराड येथे रोडच्या कडेला असलेल्या गणेश ट्रेडिंग नावाच्या दुकानावर छापा टाकला असून त्यामध्ये दुकान मालकाकडून  44 हजार 739 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
जप्त केलेल्या गुटख्यामध्ये गोवा, विमल, दुबई, नजर, राज निवास, आरएमडी व सुगंधी तंबाखूचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाई करण्यात आली आहे. 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मुसळे, पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विजय शिर्के, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, विजय सावंत, मंगल कांबळे यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: