Dainik Aikya - कारागृहातील बंदीवानाचा शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कारागृहातील बंदीवानाचा शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 8 : सातारा जिल्हा कारागृहातील बंदीवानाने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शौचालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या बंदीवानाचे सागर किसन पार्टे (रा.केळघर, ता.जावली) असे नाव आहे.
कारागृह पोलीस दत्तात्रय ज्ञानदेव चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सागर पार्टे याच्याविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असल्याने त्याला मेढा पोलिसांनी अटक केली. अटकेच्या कारवाईनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने सातारा कारागृहात त्यास ठेवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे बंदीवान सर्कल नंबर 3 च्या बाहेर होते. त्यातील सागर पार्टे हा लगतच्या शौचालयामध्ये गेला होता. सफाई कामगाराला शौचालयामध्ये संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्याने पोलिसांना सांगितले. कारागृह पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घेवून पाहणी केली असता सागर टाईलच्या फरशीने स्वत: हातावर वार करून घेत होता.     
ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला करून तेथून ताब्यात घेतले. हातातून रक्त आल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले.  या प्रकरणी दुपारी उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सागर पार्टेवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: