Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 10:54 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात द्वारकानाथ पाटील या शेतकर्‍याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हिंसक आंदोलनाला चाप लावावा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी भरपाई वसूल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे. 13 ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या हिंसक आंदोलनांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य असली तरी त्यासाठी सुरू असलेले हिंसक आंदोलन योग्य नाही. आजच्या महाराष्ट्र बंदमध्येही राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ही बाब गंभीर असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.         
सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणार्‍यांवर कारवाई करण्यात
यावी. हिंसाचार करणार्‍यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. आंदोलकांना कलम
149 अंतर्गत नोटिसा बजावण्यात याव्यात. बंद पुकारणार्‍या मराठा संघटना असल्या तरी हिंसाचार करणारे कोण आहेत?
हिंसाचार करणार्‍यांना शोधून काढावे आणि त्यांच्याकडून
नुकसानभरपाई वसूल करावी. 2003 साली शिवसेना-भाजपने महाराष्ट्र बंद केला होता. त्यावेळी कायद्यातील तरतुदीनुसार दोन्ही पक्षांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. कायद्यातील याच तरतुदींचा आधार घेऊन राज्यभरात निघणार्‍या मराठा मोर्चांना रोखता येऊ शकते, असे आशिष गिरी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: