Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बंदला नागठाणेसह परिसरातील गावांमधून उत्स्फूर्त पाठिंबा
ऐक्य समूह
Friday, August 10, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re6
5देशमुखनगर, दि. 9 : मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी नागठाणेसह परिसरातील गावामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
ऑगस्ट क्रांतिदिनाचे निमित्त साधून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला नागठाणेसह बोरगाव, अपशिंगे (मि.), देशमुखनगर, अतीत, काशीळ, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागठाणे येथील शाळा, कॉलेज, दूध डेअर्‍याही बंद होत्या तर महामार्गावर वाहतूकही ठप्प होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गावांमधून तसेच महामार्गावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: