Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इंधन दराचा भडका सुरूच पेट्रोल, डिझेलचा नवा उच्चांक
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली अभूतपूर्व घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलांचे वाढत असलेले दर यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग 13 व्या दिवशी वाढ झाली. या दरांनी शुक्रवारी नवा उच्चांक गाठला होता. पेट्रोल प्रतिलिटर 48 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 55 पैशांनी महाग झाले. मुंबईत पेट्रोल 87.39 रुपयांना तर डिझेल 76.51 रुपयांना मिळत होते.
इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठल्याने महागाईचा भडका उडणार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती 5 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ केली आहे.  
पेट्रोल व डिझेलच्या दरात शुक्रवारी पुन्हा अनुक्रमे 48 व 55 पैशांनी वाढ झाली. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अमरावतीत पेट्रोल 88.64 रुपये प्रतिलिटर, असे सर्वात महाग होते. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 88.44 रुपये तर सोलापुरात 88.44 रुपये प्रतिलिटर झाला होता. दिल्लीत पेट्रोलचे 79.99 रुपये आणि डिझेल 72.07 रुपये झाले होते. पुण्यात पेट्रोल 87.19 रुपये व डिझेल 75.14 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल 87.87 रुपये व डिझेल 77.04 रुपये झाले होते. या दरवाढीवरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. इंधनाच्या भडकलेल्या दरांविरोधात काँग्रेसने 10 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: