Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिल्लीतून ‘आयसिस’च्या दोन दहशतवाद्यांना अटक
ऐक्य समूह
Saturday, September 08, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांच्या विशेष पधकाने गुरुवारी रात्री ‘इस्लामिक स्टेट इन जम्मू-काश्मीर’ (आयएसजेके) या आयसिसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली. परवेझ अहमद लोन (वय 24) आणि जमशेद (वय 19) अशी त्यांची नावे असून त्यांना त्यांना लाल किल्ला परिसरातील जामा मशीदीजवळील काश्मिरी गेटच्या बस स्टॉपवरून ताब्यात घेतले.
पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त गोविंद शर्मा यांनी या कारवाईची माहिती शुक्रवारी माध्यमांना दिली. ‘इस्लामिक स्टेट इन जम्मू-काश्मीर’ ही ‘आयसिस’शी संलग्न असलेली संघटना आहे. या दहशतवाद्यांकडून दोन पिस्तुले, दहा काडतुसे, चार मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशातून खरेदी केली होती. हे दहशतवादी शस्त्रे घेऊन काश्मीरला निघाले होते. त्याच वेळी त्यांना अटक करण्यात आली. परवेज हा बी. टेक. असून त्याने अमरोहा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून ही पदवी घेतली आहे. जमशेद हा इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा करत असून शेवटच्या वर्षात शिकत होता. परवेझचा थोरला भाऊ आधी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होता. नंतर तो ‘आयएसजेके’ या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
दोघांपैकी एक दहशतवादी काश्मीरमध्ये राहातो.
 दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुप्तचर यंत्रणा दोघांची चौकशी करत आहेत. जानेवारीत सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत परवेझचा भाऊ झाला होता. या दोन्ही दहशतवाद्यांची दिल्लीत हल्ला घडवण्याची योजना नव्हती. त्यांचा अव्वल नेता उमर नजीर आणि दुसर्‍या क्रमांकाचा नेता आदिल थोकर आहे. दोघेही आदिलच्या आदेशानुसार काम करत होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: