Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मालदनमध्ये स्वाईन फ्ल्यू संशयित रुग्ण आढळला
ऐक्य समूह
Monday, September 10, 2018 AT 11:51 AM (IST)
Tags: re4
5ढेबेवाडी, दि. 9 : ढेबेवाडी विभागातील मालदन, ता. पाटण येथे स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला संशयित रुग्ण आढळला असून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे विभागात खळबळ माजली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत ग्रामस्थ व डॉक्टरांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मालदन येथील एक युवक गेल्या आठ दिवसांपासून थंडी, ताप, खोकला व श्‍वसन क्रियेस त्रासाने आजारी होता. शुक्रवारी त्याला जास्त त्रास होवू लागल्याने त्याला एका दवाखान्यात आणण्यात आले. तिथे रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉक्टरांना स्वाईन फ्ल्यू सदृश लक्षणे जाणवल्याने त्याला तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून  तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे  परिसरात खळबळ माजली असून आरोग्य विभाग देखील खडबडून जागा झाला आहे. सोमवारी तातडीने ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. तसेच घरोघरी जावून सर्वे करण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र सणबूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: