Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
न्या. रंजन गोगोई नवे सरन्यायाधीश
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचे दुसर्‍या क्रमांकाचे न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे नवे सरन्यायाधीश असणार आहेत. राष्ट्रपतींनी नवे सरन्यायाधीश म्हणून गोगोई यांची नियुक्ती केली आहे. ते 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे 2 ऑक्टोबरला निवृत्त होत असून आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. मिश्रा यांनी न्या. गोगोई यांच्या नावाची केंद्र सरकारला शिफारस केली होती. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यावर राष्ट्रपतींनी याबाबत आदेश काढला आहे.
न्या. गोगोईंच्या रूपाने ईशान्य भारतातील व्यक्ती प्रथमच सरन्यायाधीशपदी नियुक्त होते आहे. सर्वोच्च न्यायालयतील ज्येष्ठताक्रम लक्षात घेता न्या. मिश्रा यांच्यानंतर न्या. गोगोई हे दुसर्‍या स्थानी आहेत. सरन्यायाधीशांनंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदाची जबाबदारी दिली जाते.
न्या. गोगोई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. ते 1978 पर्यंत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली पाटील, फौजदार सागर गवसणे, पोलीस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, प्रवीण शिंदे, जोतीराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
न्या. रंजन गोगोई नवे सरन्यायाधीश
वकिली करत होते. गुवाहाटी उच्च न्यायालयातही त्यांनी वकिली केली होती. त्यांची 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. 9 सप्टेंबर 2010 रोजी त्यांची बदली पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांची पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती झाली होती. 23 एप्रिल 2012 रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांची नियुक्ती नवे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली आहे. न्यायपालिकेतील या सर्वोच्च पदावर त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 पर्यंत असेल. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्या. मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यात न्या. गोगोई यांच्यासमवेत न्या. जे. चेलमेश्‍वर (आता निवृत्त), न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश होता. त्यामुळे न्या. मिश्रा हे न्या. गोगोई यांची शिफारस करणार नाहीत आणि केंद्र सरकार न्या. गोगोईंची भावी सरन्यायाधीश म्हणून निवड करणार नाहीत, असा गैरसमज पसरवण्यात येत होता. मात्र, न्या. गोगोई यांच्या नियुक्तीमुळे हा गैरसमज दूर झाला आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: