Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड तालुक्यात 1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
120 जणांवर तात्पुरत्या तडीपारीची कुर्‍हाड
5कराड, दि. 13 : गणेशोत्सवात कराड तालुक्यातील शांतता भंग होऊ नये म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या 1100 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अवैध दारु विकणार्‍या 12 जणांवर मुंबई दारुबंदी कायदा कलम 93 नुसार कारवाई केली आहे तर 120 जणांना तात्पुरता मनाई (तडीपार) आदेश देण्यात आल्याची माहिती कराडचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.
गणेशोत्सवात कराड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कराड शहर, तालुका, तळबीड व उंब्रज पोलीस ठाण्यात ज्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशा 1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात विघ्न आणू नये  आणि आपल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये. तसे झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या 12 जणांवर मुंबई दारुबंदी कलम 93 नुसार कारवाई करण्यात आली आहे. कराड उपविभागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 120 जणांना तात्पुरती मनाई (तडीपार) आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक ढवळे यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: