Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात दोन ठिकाणी युवतींची आत्महत्या
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : वेगवेगळ्या कारणावरुन जिल्ह्यात दोन अल्पवयीन युवतींनी आत्महत्या केली. या घटना सातारा शहर व वाठार स्टेशन येथे घडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, आरीन बालेखान पठाण (वय 16, रा. वाठार स्टेशन) ही युवती कुटुंबीयांसमवेत राहण्यास होती. बुधवारी तिने विषारी कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारासाठी प्रथम तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.  त्यानंतर पुढील उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दुसर्‍या घटनेबाबत माहिती अशी, अक्षदा अजय आवळे (वय 17, रा. मंगळवार पेठ) ही युवती राहण्यास होती. तिने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून  त्या दोघींच्या आत्महत्येमा-गील कारण समजू शकले नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: