Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महामार्गावर दोन ट्रक चालकांना लुटणार्‍यास पोलिसांनी पकडले
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 13 : महामार्गावर ट्रक चालकांना दुचाकी गाडी आडवी मारुन लुटमार  करणार्‍या अक्षय दीपक अवघडे (वय 25, रा. आसगाव रेल्वे फाट्याजवळ, वडूथ, ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तळबीड पोलिसांनी अटक केली असून संशयिताने  दोन ठिकाणी ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, ज्या ट्रक चालकांची लुटमार झाली आहे त्यांनी त्या पोलीस ठाण्याशी संपर्क करुन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावर ट्रक चालकांना थांबवून लुटमार होत असल्याच्या घटना घडत होत्या. एलसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर ते लक्ष ठेवून होते. एक युवक क्रमांक नसलेल्या दुचाकीवरुन संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. संशयित तळबीड परिसरात असल्याने तळबीड पोलिसांशी संपर्क ठेवून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयिताने सहा महिन्यांपूर्वी व दोन महिन्यांपूर्वी ट्रक चालकांना थांबवून लुटमार केली असल्याची कबुली दिली. 
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली पाटील, फौजदार सागर गवसणे, पोलीस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, प्रवीण शिंदे, जोतीराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: