Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गर्दीचा गैरफायदा घेवून स्टॅण्डवरुन साडेपाच तोळे सोने लांबवले
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 13 : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एस.टी.त बसताना गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञाताने साडेपाच तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लांबवल्याचीघटना घडली आहे.
याबाबत सौ. जयश्री विकास शिवणकर (वय 35, रा. संगमनगर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी 5 वाजता तक्रारदार जयश्री शिवणकर या वेणेगावला जाण्यासाठी फलाटावर थांबल्या होत्या. सातारा-पाटण ही एस.टी. आल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. याच गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या पर्समधील दोन तोळ्याचे गंठण, सव्वा तोळ्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची वेल, सोन्याची नथ व रोकड असा ऐवज लांबवला.
चोरीची घटना समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे घटनास्थळी गर्दीही झाली.  पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र एक एस.टी. आडवी आल्याने त्यामध्ये चोरटे कैद होवू शकले नाहीत. त्याच गर्दीतून चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरीच्या घटनेनंतर इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: