Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यवतेश्‍वर येथे अनधिकृत बांधकाम करणार्‍या आठ जणांवर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Friday, September 14, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : यवतेश्‍वर येथे केलेले अनधिकृत बांधकाम काढून न टाकणार्‍या आठ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची रणजित आनंदराव मोरे, संदीप अविनाश पवार, जालिंदर काळू उंबरकर, अतुल प्रभाकर घोडके, लक्ष्मण गणपत कदम, दिनकर दगडू शिर्के, सविता यशवंत साळुंखे, संतोष वामन पवार (सर्व रा. यवतेश्‍वर, ता. सातारा) अशी नावे आहेत.  या प्रकरणी संदीप संपन वनवे (रा. विकासनगर, खेड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यवतेश्‍वर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी महसूल यंत्रणेने त्याबाबतची पाहणी केली होती. अनधिकृत बांधकामांची पाहणी झाल्यानंतर त्यावर एक अहवाल तयार करण्यात आला. अहवालाद्वारे अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या. प्रशासनाने या नोटीसा बजावूनही त्या ठिकाणचे अतिक्रमण संबंधितांनी काढले नाही. यामुळे तक्रारदार यांनी बुधवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: