Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शांतता भंग करणार्‍यांना जशास तसे उत्तर देऊ
ऐक्य समूह
Monday, October 01, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: na1
5अहमदाबाद, दि. 30 (वृत्तसंस्था) : अतिरेक्यांनी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरू केले होते. त्यामुळेच आम्हाला सर्जिकल स्ट्राईक करावा लागला, असे सांगतानाच जे लोक आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा आणि देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाकिस्तानला दिला.
‘मन की बात’मधून देशवासीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 29 सप्टेंबर रोजी ‘पराक्रम दिवस’ साजरा केल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला सलामही केला. आता गप्प बसायचे नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न केला तर आमचे सैनिक त्यांना जशास तसे उत्तर देतील. भारताने नेहमीच शांततेचा मार्ग पत्करला आहे. मात्र त्यासाठी देशाच्या अखंडतेला धक्का पोहोचू दिला जाणार नाही, असे मोदींनी ठणकावले.  
यावेळी मोदींनी मन की बातमध्ये नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांचा उल्लेख करताना त्यांच्या साहसाचेही कौतुक केले.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्याबरोबरच गांधी जयंतीनिमित्त जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवाय लालबहादूर शास्त्री यांची जयंतीही साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊनच 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगतानाच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले. मानवाधिकार आपल्यासाठी नवीन नाही, असे वाजपेयी म्हणाले होते, असेही त्यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: