Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आयसीसी वनडे रँकिंग जाहीर; रोहित शर्माची मोठी झेप
ऐक्य समूह
Monday, October 01, 2018 AT 11:42 AM (IST)
Tags: sp1
5मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : आशिया चषकात कर्णधाराला साजेशी कामगिरी करणार्‍या रोहित शर्माला बक्षिसी मिळाली आहे. आयसीसीच्या रविवारी जाहीर झालेल्या वनडे क्रमवारीत त्याने दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर कायम आहे.
विराट कोहलीच्या नावावर 911 गुण असून तो पहिल्या तर 844 गुणांसह रोहित शर्मा दुसर्‍या स्थानावर आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताच्या तीन खेळाडूंचा ‘टॉप टेन’मध्ये समावेश आहे. पहिल्या स्थानावर विराट, दुसर्‍या स्थानावर रोहित तर पाचव्या स्थानावर शिखर धवन आहे. आशिया चषकात शिखर धवनला साजेसा खेळ करता आला नाही. परंतु, त्याला 802 गुण असल्याने तो पाचव्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचे तीन, इंग्लंड-न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत.
वनडे क्रमवारीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर असून दुसर्‍या स्थानावर भारतीय संघ आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली आणि भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे.
गोलंदाजीत एकदिवसीय क्रमवारीत कुलदीप यादवने मोठी झेप घेतली आहे. 700 गुणांसह कुलदीप यादव तिसर्‍या स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: