Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तिघांना जाहीर
ऐक्य समूह
Wednesday, October 03, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na1
लेझर तंत्रज्ञानातील क्रांतिकारी बदलांमुळे सन्मान
5ओस्लो, दि. 2 (वृत्तसंस्था) : जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार मानल्या जाणार्‍या नोबेल पुरस्कारांमधील भौतिकशास्त्रातील पुरस्कार आर्थर अश्कीन, गेरार्ड मोरौ आणि महिला वैज्ञानिक डोना स्ट्रीकलँड यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांमध्ये तब्बल 50 वर्षांनी महिला शास्त्रज्ञाची वर्णी लागली आहे. लेझर तंत्रज्ञानातील क्रांतिकारी संशोधनाबद्दल या तिघांचा सन्मान करण्यात येणार आहे. या संशोधनामुळे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया खूप सोप्या झाल्या आहेत.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची एकूण रक्कम 1.01 अब्ज अमेरिकी म्हणजेच 8 लाख 70 हजार युरो असून ती तिघांना विभागून देण्यात येणार आहे. अमेरिक वैज्ञानिक आर्थर अश्कीन यांना पुरस्काराची निम्मी रक्कम मिळणार असून फ्रेंच वैज्ञानिक गेरार्ड मोरौ आणि कॅनेडियन वैज्ञानिक डोना स्ट्रीकलँड यांना उर्वरित रकमेपैकी प्रत्येकी अर्धा हिस्सा देण्यात येणार आहे. 
या तिघांनीही ‘लेझर फिजिक्स’ विषयात क्रांतिकारी संशोधन केले आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या
प्रमाणात वापरले जात आहे. डोना स्ट्रीकलँड यांच्या रूपाने भौतिकशास्त्राचे नोबेल तब्बल 55 वर्षांनंतर महिलेला मिळाले आहे तर विज्ञानातील नोबेल पुरस्कार आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाले आहेत. आर्थर अश्कीन हे सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरले आहेत. वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेत्यांची नावे सोमवारी जाहीर केल्यानंतर आज भौतिकशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. आठवडाभरात
विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय नोबेल अकादमीने
घेतला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: