Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीर भारताचाच भाग : राजनाथसिंह
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि भारताचाच राहील. कोणतीही शक्ती त्याला आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी पाकिस्तानला ठणकावून सांगितले.
लखनऊ येथे सीआरपीएफच्या रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या 26 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्‍न त्याचबरोबर मदत आणि बचाव कार्यांमध्ये रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स अग्रेसर असते. यावेळी राजनाथ यांनी सीआरपीएफच्या कार्याचे कौतुक केले. काश्मिरी लोक आणि दहशतवाद्यांशी योग्य प्रकारे हाताळणी करुन नियंत्रण मिळवण्याचे कार्य सीआरपीएफने केले.
जर काही काश्मिरी तरुणांनी काही लोकांच्या बहकाव्यात येऊन नको असलेल्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना तुम्ही आपल्या देशाचे नागरिक या नात्याने योग्यप्रकारे हाताळा. पण जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये अडकली असेल तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला त्यांचा खात्मा करण्यापासून थांबवू शकत नाही, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना आपले सुरक्षा रक्षक सडेतोड उत्तर देत असल्याने सध्या तेथे दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: