Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शालेय विद्यार्थिनीचे फेक अकौंट काढून मित्राशी अश्‍लील चॅट
ऐक्य समूह
Thursday, October 11, 2018 AT 10:49 AM (IST)
Tags: lo1
दोघांना चोपून दिले पोलिसांच्या ताब्यात
5सातारा, दि. 10 : फेसबुकवर शाळेत शिकणार्‍या मुलीचे बनावट खाते काढून मित्राशी अश्‍लील संभाषण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर जमावाने दोन मुलांना चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  सातार्‍यातील एका शाळेत दोन्ही संशयित विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या दोघांनी एका मैत्रिणीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट काढले. त्या फेसबुक अकाउंटवरून दोघांनी शाळेतीलच एका मित्राला फे्रंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी अश्‍लील चॅटिंग केले. संबंधित विद्यार्थ्याने या घटनेची माहिती शिक्षकांना दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून त्याबाबत सांगितले. संबंधित पालकांनी व मुलीने मात्र फेसबुकवर अकाउंटच काढले नसल्याची माहिती दिली. पालक व शिक्षक या घटनेच्या मुळाशी गेल्यानंतर शाळेतीलच दोन मुलांनी फेक अकाउंट  काढल्याचे समोर आले.  ही घटना मंगळवारी घडल्यानंतर दोन्ही युवकांची जमावाने यथेच्छ धुलाई केली. या सर्व घटनेनंतर मुलीच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: