Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात दोन घरफोड्यांमध्ये 1 लाखाचा ऐवज लांबवला
ऐक्य समूह
Monday, November 05, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 4 : सातारा परिसरातील देगाव रोड व मंगळवार पेठ या दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेे. या दोन्ही घटनांमध्ये बंद घरे चोरट्यांनी लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत कुसुम राजेश शर्मा (वय 60, रा. देगाव फाटा, एमआयडीसी) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 2 रोजी त्या घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. बंद घर पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख 40 हजार रुपये, मनगटी घड्याळे, सोन्याची माळ व चांदीचे सिक्के असा एकूण 74 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.
दुसर्‍या घटनेबाबत शर्मिला ऋषिकेश राजे (वय 40, रा. मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे.  
त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या त्या पुणे येथे राहत आहेत. मंगळवार पेठेतील वाड्यातून अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून 9 हजार रुपये किमतीची पितळीची भांडी चोरुन नेली आहेत. या दोन्ही घटना समोर आल्यानंतर शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: