Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अंगापूर येथे जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्या जप्त ; तीन जणांना अटक
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 :  येथील अंगापूर फाटा ते अंगापूर रोड या दरम्यान बिनधास्तपणे स्फोटक पदार्थ असणार्‍या जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्याची वाहतूक करणार्‍यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह अ‍ॅक्टनुसार तीन जणांविरोधात  गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेल्यांची अविनाश राजेंद्र जाधव (वय 27), बाजीराव शंकर जाधव (वय 29), मारुती तानाजी जाधव (वय 21, तिघे रा.अंगापूर वंदन, ता.सातारा) अशी नावे आहेत.
 या प्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बोरसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, दि. 4 रोजी दुपारी दीडच्या सुमारास अंगापूर वंदन येथे स्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी धाव घेवून छापा टाकला.
यावेळी पीक क्षेत्रालगत तीन ट्रॅक्टर उभे होते व लागूनच विहीर खोदण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी जिलेटीनच्या 172 व डिटोनेटरच्या 99 या स्फोटकाच्या कांड्या सापडल्या. पोलिसांनी संशयित तिघांकडे चौकशी करून त्या साठ्याबाबत व वाहतुकीबाबत विचारले असता त्यांना काहीच माहिती देता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: