Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओडिशात पाच नक्षलवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Tuesday, November 06, 2018 AT 10:51 AM (IST)
Tags: mn2
5भुवनेश्‍वर, दि. 5 (वृत्तसंस्था) : ओडिशात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या सुरक्षा दलाच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांचा दबदबा असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. 
रविवारी सकाळपासूनच मलकानगिरी जिल्ह्यातील कलिमेदा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांदरम्यान जोरदार चकमक उडाली. यावेळी सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना प्रतिउत्तर देत पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले.
गेल्याच आठवड्यात छत्तीसगडमधील दंतेवाडा येथेही नक्षलवादी आणि जवानांदरम्यान चकमक उडाली होती. त्यात दोन जवान
शहीद झाले होते. या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यूही झाला होता तर त्यापूर्वी बिजापूरमध्येही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: