Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण तालुक्याच्या पश्‍चिम भागात वरुणराजाची जोरदार हजेरी
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
5आदर्की बुद्रुक, दि. 6 : दीपावली म्हणजे प्रकाश व आनंदोत्सव साजरा करण्याचा सण. फलटण तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक परिसरामध्येही नरक चतुर्दशी (अभ्यंगस्नान) पहिली अंघोळ करण्याची धामधुम सुरू असतानाच मंगळवारी पहाटे वरुणराजाने निसर्गालाही दीपावलीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान घालून शेतकरी वर्गाला दिलासा दिला.
यावर्षी वरुणराजाने दडी मारल्याने फलटण तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, आज नरक चतुर्दशी (अभ्यंग स्नान) दीपावलीच्या पहिल्या दिवशी पहाटे वरुणराजाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला दिलासा वरुणराजाची जोरदार हजेरी
मिळाला आहे. दरम्यान, आदर्की खुर्द, बुद्रुक परिसरातील डोंगर रांगांवर जास्त पाऊस पडल्याने आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक ओढ्याला पावसाळा संपल्यानंतर प्रथमच दीपावली सणामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये पूर आला ही समाधानाची बाब आहे. दुष्काळी परिस्थिती परिसरात निर्माण झाल्याने गहू, कांदा सारखी पिके घेण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता निर्माण झाली होती. मात्र, या पावसामुळे व ओढ्याला आलेल्या पुरामुळे ती चिंता आता दूर होणार आहे. कमी अधिक प्रमाणात फलटण तालुक्यात पावसाने मंगळवारी पहाटे हजेरी लावली. फलटण तालुक्यासह पश्‍चिम भागामध्ये यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला होता. पाण्याअभावी काही पिके हातची गेल्याने शेतकरी अस्वस्थ होता. यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. मात्र, फलटण तालुक्याच्या पश्‍चिम भागातील ओढ्याला यावर्षी पावसाळ्यामध्ये पूर आला नव्हता. फलटण तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये धोम-बलकवडी, नीरा-देवघर धरणाचे पाणी कालव्यातून आल्याने ओढा, फाटा याद्वारे तलाव, पाझर तलाव, नालाबांध भरून घेतले जात असल्याने दुष्काळाची तीव्रता काही प्रमाणात जाणवली नाही. त्यातच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र आज पहाटे अभ्यंगस्नान (नरक चतुर्दशी) पहिल्या दिवशी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील आदर्की बुद्रुक, खुर्द परिसर आणि डोंगरावर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने आदर्की खुर्द, बुद्रुक ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी हिंगणगाव तलावामध्ये जात असल्याने हिंगणगाव, आरडगाव व परिसरातील शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळणार असल्याने परिसरातील शेतकरी आनंदी झाले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: