Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फैजाबाद झाले अयोध्या
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5उत्तरप्रदेश, दि. 6 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अजून एका जागेचे नाव बदलले आहे. योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या असे केले आहे. 
अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमास दक्षिण कोरियाच्या
प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अजून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार असून त्याला राजा दशरथ यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच एक विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याला प्रभू श्री रामाचे नाव देणार आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: