Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भीमा-कोरेगाव हिंसाचार
ऐक्य समूह
Wednesday, November 07, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: mn3
सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीसना 14 दिवसांची कोठडी
5पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले संशयित अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप न्यायालयासमोर जबाब देताना मंगळवारी केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्वीस या तिघांना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयासमोर साक्ष देताना परेरा म्हणाले, 4 नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या 8-10 वेळा कानशिलात लगावल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: