Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
ऐक्य समूह
Friday, November 30, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo1
विजय कुंभार यांच्याकडे स्थागुशाचा पदभार
5सातारा, दि. 29 : पोलीसअधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून अपेक्षेप्रमाणे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सोपवला आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत, असे या संबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांची बदली मानव संसाधन विभागात करण्यात आली असून वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना जिल्हा वाहतूक शाखेकडे पाठवण्यात आले आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कोंडुभैरी यांना फलटण पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. 
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांची वाई पोलीस ठाण्यात तर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांचे नाव स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी चर्चेत होते. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडेच हा पदभार सोपवण्यात आला आहे. नेमणुकीच्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: