Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अनुदानित सिलिंडर साडेसहा रुपयांनी स्वस्त
ऐक्य समूह
Saturday, December 01, 2018 AT 11:50 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती अनुदानित गॅस सिलिंडर 6.52 रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त केला आहे. दिल्लीत शुक्रवारी या संदर्भातली घोषणा करण्यात आली.
आतापर्यंत अनुदानित सिलिंडर दिल्लीत 507.42 रुपयांना मिळत होता. तो आता 500.90 रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दिल्लीत हा सिलिंडर 942.50 रुपयांना मिळत होता. तो आता 809.50 रुपयांना मिळणार आहे. नवे दर 1 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचेही तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये सहा वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर प्रथमच कपात होत आहे. जूनपासून अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची वाढ झाली होती. 1 नोव्हेंबरला अनुदानित गॅस सिलिंडर 2.94 रुपयांनी महागला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: