Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा येथे श्रृंगेरीपीठाचे शंकराचार्यं जगदगुरु
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:36 AM (IST)
Tags: lo1
श्री विधुशेखरभारती महास्वामींचे उत्साहात स्वागत
5सातारा, दि. 2 : येथील चिमणपुरा पेठेतील श्रीकृष्ण वेद पाठशाळेत रविवारी सायंकाळी श्रृंगेरीपीठाचे शंकराचार्यं जगदगुरु श्री विधुशेखरभारती महास्वामींच्या  विजय यात्रेचे मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात आगमन झाले. शनी मंदिरापासून शंकराचार्यांच्या पादुकांची फुलांनी सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
परिसरात महारांगोळ्या तसेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. कराड येथून महास्वामींचे आगमन झाल्यावर हातात 51 सुवासिनींनी पंचारती घेऊन महास्वामींच्या पादुकांचे औक्षण केले. त्यानंतर महास्वामींच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. त्या पादुका जय जय शंकर, हर हर शंकर.. महादेव शंभो, जय जय शंभो.. आर्य ंसनातन वैदिक हिंदु धर्म की जय, शंकाराचार्यं महास्वामींचा विजय असा आदी मंत्रांचा उच्चार करीत वाजत, गाजत वेद पाठेशाळेत आणल्यावर वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी हातात पूर्ण कुंभ घेऊन महास्वामींचे स्वागत केले. त्यांच्या पादुकांना दुध-पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. सौ. वेदवती गोडबोले, सौ. विभावरी गोडबोले व सुवासिनींनी पंचारतींनी महास्वामींचे औक्षण केेले. त्यानंतर महास्वामी व्यासपीठावर आले. त्यांनी आद्य गुरु शंकराचार्यं तसेच इतर देवतांच्या प्रतिमांचे पूजन केल्यावर वेद मंत्र घोषात दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महास्वामींची धुलिकापूजन, मार्गदर्शनपर आशीर्वचन होऊन वेदपठण कायर्ंक्रम संपन्न झाला.
त्यानंतर स्वागतगीत व पुष्पहार समर्पण कार्यक्रम होऊन महास्वामींनी अनुग्रह भाषण केले. त्यानंतर भाविकांनी भजने व संगीत तसेच स्तोत्र पठण कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री साडेआठ ते दहा वेळेत महास्वामींनी चंद्रमौळीश्‍वराची षोडशोपचारपूजा केली.
आज महास्वामींच्या दर्शनाचा लाभ
सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत जगतगुरु महास्वामींचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना होणार असून त्यानंतर दुपारी साडेपाच वाजता गुुरुवंदना सभा कार्यक्रम होणार आहे. रात्री भजन, संगीत संध्या व स्तोत्र पठण होऊन रात्री कार्तिक सोमवारनिमित्त विशेष चंद्रमौळेश्‍वर पूजा होणार आहे. महास्वामींचा मुक्काम  सातारा येथे मंगळवारी दुपारपर्यंत असून त्यानंतर त्यांचे बारामतीकडे प्रस्थान होणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: