Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मसाईवाडी येथे इसमाची गळफास घेवून आत्महत्या
ऐक्य समूह
Monday, December 03, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: re2
5म्हसवड, दि. 2 : मसाईवाडी, ता. माण येथील पोपट सावळा बनगर (वय 55) याने आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्त्या केली. या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ बापू सावळा बनगर (वय 60, रा. मासाईवाडी) यांनी म्हसवड पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मसाईवाडी गावच्या हद्दीत मोहर्‍याच्या शेतातील आंब्याच्या झाडास  रविवार, दि. 2 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 च्या दरम्यान पोपट सावळा बनगर याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार कांबळे तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: