Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कवठे येथे अपघातात पादचारी जागीच ठार
ऐक्य समूह
Tuesday, December 04, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: re2
5भुईंज, दि. 3 : पुणे-बंगलोर महामार्गावर कवठे, ता. वाई गावच्या हद्दीत उड्डाण पुलावरील एस. टी. बस थांब्यावर उभ्या असलेल्या पादचार्‍यास पाठीमागून आलेल्या झायलो कारने जोराची धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की किसनवीर साखर कारखान्याचे सेवानिवृत अधिकारी मारूती बाबूराव डेरे (वय 73), रा. कवठे, ता. वाई हे सकाळी सातारा येथे नातेवाइकांच्या विवाह समारंभास गेले होते. विवाह सोहळा उरकून ते साताराहून कवठे या आपल्या गावी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास कवठे गावच्या हद्दीत असलेल्या उड्डाण पुलावरील एस. टी. बस थांब्यावर उतरून थांबले होते. त्याच वेळी साताराकडून भरधाव वेगात पुण्याकडे निघालेल्या झायलो कारने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते रस्त्यावर जोरात पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर कवठे येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली असून हवालदार भोसले तपास करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: