Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तमिळनाडू येथील बोअरवेलच्या गाडीवरील कर्मचारी बेपत्ता
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: re2
5भुईंज, दि. 5 : गोव्यावरून निघून सातारा मार्गे राजस्थानकडे निघालेल्या बोअरवेलच्या गाडीवरील एक कामगार वेळे गावच्या हद्दीतून बेपत्ता झाला असल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गोव्याहून राजस्थानकडे निघालेल्या बोअरवेलच्या गाडीत (क्र. टीएन 34 एम 6633) चालकासहित सात जण होते. गोव्यावरून निघून ते राजस्थानकडे जाताना भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळे गावानजीक खंबाटकी बोगद्याच्या नजीक असलेल्या पेट्रोल पंपासमोर थांबले होते. यातील एम.सुरेश मादप्पन (वय 24), रा. असिकीथी कोबाई, गुथियालाथूर, ता.सत्यमंगलम, जि. ईरोड तमिळनाडू हा लघुशंकेसाठी उतरला. बराच वेळ झाला तरी तो परत गाडीजवळ न आल्याने त्याच्या सोबतच्या इतर साथीदारांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु न मिळल्याने त्यांनी भुईंज पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
सदर इसम कोणास आढळल्यास भुईंज पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि. बाळासाहेब भरणे, हवालदार आनंदा भोसले यांनी केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: