Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एटीएम प्रकरणी पथके रवाना
ऐक्य समूह
Thursday, December 06, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
फुटेज अस्पष्ट; पोलिसांची कसरत
5सातारा, दि.5 : बारावकरनगर येथील एटीएम फोडून 20 लाख रुपये लंपास केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान मिळालेले फुटेज अस्पष्ट असल्याने पोलिसांना तपास करताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बारावकरनगर (कोडोली) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून सुमारे 20 लाख रुपये लंपास केले होते. एटीएमची काच फोडून आतमध्ये लावण्यात आलेले कॅमेरे फोडून अज्ञात चोरट्यांनी केलेल्या जबरी चोरीमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. चोरट्यांनी घटनास्थळी कोणतेही पुरावे न सोडल्याने पोलिसांसमोर तपासाबाबत आव्हान निर्माण झाले असतानाच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी लवकरच धागेदोरे हाती लागतील, असे सांगितले जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: