Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महेश नागरी सहकारी पतसंस्थेमधील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित : सारडा
ऐक्य समूह
Friday, December 07, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ठेवींची जबाबदारी संचालक मंडळाची आहे. त्यामुळे सभासदांनी घाबरून जावू नये. यापूर्वी जसा आमच्यावर विश्‍वास दाखवला तसाच विश्‍वास यापुढेही दाखवावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. मुकुंद सारडा व संचालक मंडळाने पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, संस्थेची स्थापना 1990-91 मध्ये झाली असून तेव्हापासून आजअखेर संस्था चांगले काम करत आहे. संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक अनिल जयसिंगराव जाधव, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी केलेला भ्रष्टाचार संचालक मंडळाने उघडकीस आणला आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षक हेमंत कुलकर्णी यांनी सहकार खात्याची परवानगी घेवून दोषींवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात मे 2018 मध्ये गुन्हा दाखल केला आहे. अनिल जाधव व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध ऑगस्ट 2018 मध्ये न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे. कायद्याप्रमाणे दोषींवर योग्य ती कारवाई होईलच.  या अपहाराशी संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही. संचालक मंडळाने अपहार केलेला नाही ही बाब नवीन दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये स्पष्ट झाली आहे. संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक अनिल जाधव, त्याचे कुटुंब व नातेवाइकांनी 1 कोटी, 21 लाख, 8 हजार इतक्या रकमेचा अपहार केला आहे. अपहार 3  कोटी, 30 लाख, 37 हजार इतक्या रकमेचा नसून सदर रक्कम संबंधित फिर्यादीने व्याजासह नमूद केली आहे. संस्थेने त्याबाबत योग्य ती तरतूद केली आहे.              
झालेल्या प्रकारामुळे संस्थेचे ठेवीदार, सभासदांनी विचलित होवू नये. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असे आवाहन चेअरमन अ‍ॅड. मुकुंद सारडा, व्हाईस चेअरमन सुभाष लोया, संचालक रवींद्र जाजू, शिरीष पालकर, सुरेश सारडा, सुनील राठी, राहुल गुगळे, नीलेश लाहोटी, धीरज कासट, सुरेश भस्मे, सौ. पद्मा कासट व सौ. राजश्री लाहोटी यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: