Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

दुसर्‍या दिवशी अश्‍विन, इशांत, बूमराहची कमाल
ऐक्य समूह
Saturday, December 08, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: sp1
पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 7 बाद 191
5अ‍ॅडलेड, दि. 7 (वृत्तसंस्था) : अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसर्‍या दिवशी आर. अश्‍विन, इशांत शर्मा आणि जसप्रीत बूमराह या भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या कसोटीवरील पकड मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दुसर्‍या दिवसअखेर 7 बाद 191 धावा केल्या.
भारताने दुसर्‍या दिवशी पहिल्या डावातील उर्वरित  खेळीला सुरुवात केली, पण पहिल्याच चेंडूवर डाव आटोपला. जोश हेजलवूडने मोहम्मद शमीला बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून चेतेश्‍वर पुजाराने 123 धावांची सुरेख खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 3 आणि मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, नाथन लायन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. पहिल्याच षटकात इशांतने अ‍ॅरोन फिंचला पहिल्याच षटकातील तिसर्‍य चेंडूवर त्रिफळाचित केले. त्यानंतर मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्‍विनने हॅरिसला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर लगेच अश्‍विनने शॉर्न मार्श, ख्वाजा यांची शिकार केली.
अश्‍विनला इशांत आणि बूमराहने चांगली साथ दिली. त्यांनी प्रत्येकी दोन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 191 धावा झाल्या असून ते अद्याप 59 धावांनी पिछाडीवर आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: