Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म्हसवड पोलिसांकडून तीन दुचाकीसह चोरटे जेरबंद
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re3
5म्हसवड, दि. 6 : म्हसवड परिसरात दुचाकी चोरून दुचाकी मालकांना बेजार करणार्‍या त्रिकुटांचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन बुलेट व पाच मोटारसायकल आणि एक अ‍ॅक्टिवा असा साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चोरट्यांमध्ये दोन अल्पवयीन मुले व एका तरूणाचा समावेश आहे. दुचाकी चोरटे जेरबंद झाल्यामुळे दुचाकी मालकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. या धडाकेबाज कारवाईबद्दल म्हसवडचे सपोनि. मालोजीराव देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती, अशी म्हसवड आटपाडी-दिघंची-दहिवडी हद्दीत अनेक मोटारसायकली चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात  दाखल झाल्या  आहेत. मोटारसायकल चोरी करुन बनावट नंबर प्लेट तयार करून त्या दुसर्‍या जिल्ह्यात विकल्या जात असल्यामुळे चोरीच्या गाड्या सापडत नव्हत्या व चोरटेही सापडत नव्हते. प्रत्येक वेळी चोरटे गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत होते. पोलीस हवालदार अभिजित भादुले यांनी अनेक ठिकाणी पोलीस खबर्‍यांच्या सहकार्याने तपासाला गती दिली होती. दोन दिवसांपूर्वी खबर्‍याकडून मोटारसायकल चोरट्यांची अचूक माहिती मिळाल्यानंतर शनिवार, दि. 5 जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत सपोनि. मालोजीराव देशमुख, पोलीस हवालदार अभिजित भादुले, राहुल कुंभार, नितीन धुमाळ, विजय कवडे, राहुल मदने, किरण चव्हाण, विकास कुराडे व दुभळे यांनी सापळा रचून घरावर छापा टाकून पर्यंती, ता. माण येथून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. तसेच ते अकलूज येथे असल्याचे सांगितले. रविवारी पहाटे महात्मा गांधी चौकात वेळापूर रोड हायस्कूलच्या मागे असलेल्या घराला पोलीस पथकाने वेडा देवून प्रकाश रामचंद्र चोरमले (बबन मोरे), वय 23, रा. पाटील वस्ती, अकलूज याला ताब्यात घेवून चौकशी केली असता चोरमले याने मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. तसेच म्हसवड येथून चोरलेली एक मोटारसायकल जळबावी
घाटात तेल संपल्याने सोडून दिली. दुसरी अकलूज येथे अपघात झाला म्हणून टाकून दिली तर तिसरी इंदापूर येथे अपघात झाला म्हणून सोडून दिल्याचे कबूल केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: