Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी जाहीर, दुर्घटना टळली
ऐक्य समूह
Monday, January 07, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: na2
5कोलकाता, दि. 6 (वृत्तसंस्था) : कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी (आपत्कालीन) स्थिती जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी रात्री एअर इंडियाच्या विमानातून अचानक इंधन गळती सुरू झाल्यानंतर विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. विमानतळ आणि विमानातील सर्वजण सुखरूप आहेत.
एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री विमान क्रमांक एआय-335 बँकॉकहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानातून अचानक इंधन गळतीला सुरूवात झाली. विमानामध्ये 150 प्रवासी होतो. सर्वजण सुखरूप आहेत. 
शनिवारी रात्री एअर इंडियाचे एआय-335 बँकॉकहून
दिल्लीला निघाले होते. विमानाने भारतीय हवाई क्षेत्र प्रवेश केल्यानंतर तांत्रिक अडचण आल्याचे वैमानिकाला समजले.
त्यानंतर वैमानिकाने कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: