Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोणंद औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या बॉयलरचा स्फोट
ऐक्य समूह
Tuesday, January 08, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: re2
आगीत तीन कामगार जखमी
5लोणंद, दि. 7 :  लोणंद औद्योगिक वसाहतीमधील प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज प्रा.लि., या कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत तीन कामगार जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची लोणंद पोलीस स्टेशनमध्ये झाली नव्हती. या घटनेमुळे लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सर्वच कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
प्रिव्हिलेज इंडस्ट्रीज या कंपनीत विदेशी मद्य बनविले जाते. या कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठा आवाज होऊन आग लागली. त्यानंतर धुराचे मोठे लोट येऊ लागले. या स्फोटात कंपनीतील तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लोणंदमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांचीच पळापळ झाली. आगीची भीषणता मोठी होती. त्यामुळे जेजुरी, नीरा येथून दोन बंब बोलावण्यात आले.   
या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी लोणंद पोलीसही दाखल झाले. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.
या आगीमध्ये संजय पवार (नीरा, ता. पुरंदर), अक्षय थोपटे
(पिंपरे बुद्रुक, ता. पुरंदर), दत्ता सोनवकर (रा. साखरवाडी, ता. फलटण) हे कामगार गंभीर जखमी झाले. त्यामधील दत्ता सोनवलकर यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. या आगीच्यानिमित्ताने कंपनीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: