Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नगरपरिषदा, नगरपंचायतीतील रोजंदारी कर्मचारी कायम करणार
ऐक्य समूह
Wednesday, January 09, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn2
राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या 1416 कर्मचार्‍यांना या पालिकांच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यासाठी आवश्यकता भासल्यास अस्थायी पदनिर्मितीही करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ 11 मार्च 1993 ते 27 मार्च 2000 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांना मिळणार आहे.
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील 10 मार्च 1993 पूर्वीच्या रोजंदारी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार 1416 कर्मचार्‍यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक या पदांचा समावेश राज्य संवर्गात करण्यात आल्याने या पदांवर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांचे समायोजन लिपिक या पदावर करण्यात येणार आहे. या पदांना आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तपासून समावेश करण्यात येणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: